Tuesday, February 16, 2010

'ग्राफिटी वॉल'

कविता महाजन यांचं 'ग्राफिटी वॉल' नुकतंच वाचलं. केवळ एक व्यक्ती म्हणून (स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही) लिहिणाऱ्या कमी माणसांमधल्या त्या वाटतात. 'ब्र', 'भिन्न' किंवा क्वचिद कुठेतरी वाचलेल्या कविता यातून त्यांच्या लिखाणाविषयी काही मतं तयार झाली आहेत.

आजकाल एकूणच स्वतःला जे वाटतं ते बोलणं, लिहिणं करणं याकडे लोकांचा फारसा कल नसताना आणि केवळ इतरांना काय आवडेल, रुचेल, पटेल ते आणि तसंच बोलणारी, वागणारी माणसं आजूबाजूला वावरत असताना मनात येणारं बरचसं लिहू शकणाऱ्या लेखक, लेखिकांच लिखाण वाचायला मिळालं की बरं वाटतं.

एक विशिष्ट विषय, शब्दमर्यादा असं न ठेवता ब्लॉग वर जसं, जेव्हा जे जसं वाटतं तसं लिहिलं जातं तशा प्रकारचं हे लिखाण आहे. बरेच वेगवेगळे ऑफ बिट विषय यात मांडलेत. मला वाचायला आवडलं. शक्य असेल तर मिळवून सगळ्यांनीच वाचावं असं वाटतं.

6 comments:

  1. " एक विशिष्ट विषय, शब्दमर्यादा असं न ठेवता ब्लॉगवर जसं, जेव्हा जे जसं वाटतं तसं लिहिलं जातं तशा प्रकारचं हे लिखाण आहे."
    मग त्या बाईंना ब्लॉगच उघडायला सांगायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. ग्राफिटी वॉल वाचून त्यांची लिखाणा मागची प्रक्रिया समजायलाही मदत झाली.
    कविता महाजन ब्लॉग लिहितात, पण तितका नियमित नाही.
    http://bhinn.blogspot.com/

    ReplyDelete
  3. baryach da ashya prakarche lekhan vachakana avadat aste. anil avchat yach pathaditle vat tat.

    ReplyDelete
  4. माझा नवा ब्लॉग जरूर पहा... आणि फेसबुकवर देखील जॉईन व्हा...!

    http://muktvachan.blogspot.com
    http://kavita-mahajan.blogspot.com

    - कविता महाजन

    ReplyDelete
  5. Kavitaji
    Mahiti dilyabaddal manapasun dhanyawad. Mi blogs jarur pahin.

    ReplyDelete