Friday, November 13, 2009

गंधच्या निमित्ताने...

मध्यंतरी सचिन कुंडलकरांचा 'गंध' सिनेमा पाहिला. एकूणच विषय, मांडणी, संवाद, दिग्दर्शन, कलाकार, त्यांची कामं आणि सर्वच दृष्टीने सिनेमा खूपच चांगला वाटला. यापूर्वी त्यांनी चेतन दातारांवर लिहिलेला लोकसत्तातला लेख आणि 'मिळून सार्याजणीच्या' दिवाळी अंकात सुमित्रा भावे यांच्यावर लिहिलेला लेख सोडता बाकी काहीच लिखाण वाचनात नव्हतं. अजूनही नाही.

'गंधची' तोंड भरून स्तुती ऐकून अवधूतने कुंडलकरांचं 'कोबाल्ट ब्लू' पुस्तक भेट दिलं. एका बैठकीत सहज वाचून होईल अशा आकाराचं ते पुस्तक आहे. सलग दोनदा वाचलं तरी नव्याने काही मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर, त्यांच्या नातेसंबंधांवर खूप विचार केला जाऊ शकतो असं वाटलं.

सरळसोट मध्यमवर्गीय आयुष्य जगताना फारशा उत्कट, सर्वांगानं जीवन जगणाऱ्या, प्रतिभासंपन्न, बेडर, संवेदनशील, मुक्त अशा व्यक्ती फारशा भेटत नाहीत. भेटल्या तरी त्या आपल्या जवळच्या वर्तुळातल्या असू शकतातच असं नाही तेव्हा पुस्तकातल्या, सिनेमातल्या व्यक्तिरेखा अशा दिसल्या तर मस्त वाटतं.

...आणि आता मी जुन्या आठवणी वगळून पुढे आठवण्यासाठी नव्यानेच काही अनुभव घ्यायला बघतेय ज्यात आधी वाचलेली पुस्तकही वाचायला नको वाटतं तर 'कोबाल्ट ब्लू' हा माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव ठरलाय. ( तसं गौरी देशपांडे याचं कुठलंही पुस्तक असं मस्त वाटण्याचा अनुभव देतंच त्यामुळे तीही पुस्तकं हल्ली कायम सोबत असतात.)
आता असे मस्त आठवणीत ठेवावेतच असं वाटणारे अनुभव आले की लिहीन..

10 comments:

  1. 'In the mood of love' paha Wong Kar Wai cha avdel tula ..Gandha tya Directorla arpan ahe. Zee studio var lagto adhun madhun.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. सरळसोट मध्यमवर्गीय आयुष्य जगताना फारशा उत्कट, सर्वांगानं जीवन जगणाऱ्या, प्रतिभासंपन्न, बेडर, संवेदनशील, मुक्त अशा व्यक्ती फारशा भेटत नाहीत. भेटल्या तरी त्या आपल्या जवळच्या वर्तुळातल्या असू शकतातच असं नाही तेव्हा पुस्तकातल्या, सिनेमातल्या व्यक्तिरेखा अशा दिसल्या तर मस्त वाटतं.
    ------------------------------------
    It's true , and psychologically very correct ,each one of have some things inside to do or something has pending to become ,it didn;t happened coz 'this n that'.. then he/she [if enough sensible ..] enjoys the characters in book or movie as putting himself/herself in their shoe even beyond his/her own consideration//
    Very NICE and Sensible Thought Seema !!! Great !!!!!

    ReplyDelete
  4. Sachin Kundalkar cha "RESTUARANT"....Pahila aselach....Ha movie pan asach classic ahe.

    ReplyDelete
  5. Pahayacha hota pan jamala nahi. CD vagaire milavun nakki pahin. Ha cinema lakshat aanun dilyabaddal dhanyavad.

    ReplyDelete
  6. तिसरा परिच्छेद महत्त्वाचा आहे. आवडला. ते लिहिलंयस ते बरोबर आहे. शब्दपण अगदी इकडे तिकडे करायला जागा नाहीत असे वापरल्येस, असं वाटलं.

    ReplyDelete
  7. Avadhoot
    Nehamipramanech vicharpoorvak kelelya comment baddal dhanyavad.

    ReplyDelete
  8. Gauri Deshpandench "MUKKAM" vachala aselach ...totally rich experience..Dimitri ,Iyan,kalindi...offbit people and their stories even.Gauri deshpandech book vachatana " Reading between the lines " khup strong asav lagata.

    ReplyDelete
  9. Vishalkumar
    Ho vachalay mi te.. Gauri Deshpande yanchi chacters pramanikpane ani mast anubhav ghet jagat asatat.. maja yete vachatana..

    ReplyDelete