Thursday, April 1, 2010

ब्लॉगचा पहिला वाढदिवस.

आज ब्लॉगचा पहिला वाढदिवस. अवधूतने आग्रह केला आणि मदतही केली म्हणून ब्लॉग उघडू शकले. वर्षभरात नियमीतपणे नाही तरी अधूनमधून काही लिहू शकले. मला हे लिहिताना मजा आली. आपण काहितरी लिहीलंय आणि कुणीतरी ते वाचतंय, त्याच्यावर वाटलं तर काही प्रतिक्रिया देतंय ही भावनाच सुखावह आहे. प्रतिक्रिया नाही मिळाली तरीही अनुभवलेलं काहीही, केव्हाही, कसलंही बंधन न बाळगता लिहिता येण्याचं स्वातंत्र्य मला आवडलं.
एका वर्षात बरेच वेगवेगळे अनुभव आले किंवा घेता आले. त्यातल्याच काही अनुभवांबद्दल लिहिलं. आणि आयुष्याच्या या वळणावर एकूणच आनंद, मजा, सुख या सगळ्याची कमतरता भासत असताना ब्लॉग वर काही लिहिण्याचा अनुभव आनंददायक वाटला.

आता या ब्लॉगच्या ‘पहिल्या’ वाढदिवसाबद्दल लिहितेय तर अनेक पहिल्या गोष्टी आठवतायत आयुष्यातल्या. कदाचित पुढची पोस्ट त्याबद्दल लिहेन.

10 comments:

  1. अभिनंदन ब्लॉगच्या पहिल्या वाढदिवसाबद्दल!! लिहित रहा.

    ReplyDelete
  2. MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY ....!!

    I mean it ....!!

    ReplyDelete
  3. Shubhechchhaa.
    Avadhoot

    ReplyDelete
  4. congrats.........write it for ur whole life!

    ReplyDelete
  5. Blog cha dusara wadadiwas yetoy tari navin post nahiye...

    ReplyDelete
  6. आता नविन लेख कधी लिहिणार?

    ReplyDelete
  7. छान लिहितेस तू.. एक निरागस प्रामाणिकपणा जाणवतो त्यात.. जमलं कधी तर भेटूया. मी अवधूतची क्लासमेट.

    शुभेच्छा. शीतल.

    ReplyDelete
  8. Thank you Sheetal.
    Nakki bhetu.

    ReplyDelete