Friday, November 26, 2010

बिफोर सनराईज आणि बिफोर सनसेट

. . .बिफोर सनराईज . . .
. . .बिफोर सनसेट

मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा ज्या इंग्रजी सिनेमांवरून घेतलाय (?, चोरलाय) ते हे दोन सिनेमे. एक मुलगा आणि एक मुलगी एका ट्रेनच्या प्रवासात भेटतात. एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. ब-याच गप्पा वेगवेगळ्या विषयांवर मारतात. सुरुवातीला साध्यासुध्या विषयांवर असलेल्या गप्पा नंतर थोड्या अडनिड्या, अवघड विषयांवर पण होतात. एक सबंध संध्याकाळ, रात्र ते एकमेकांसोबत असतात. वेगवेगळे अनुभव घेतात. मजा करतात. एका प्रवासात भेटलेल्या दोन माणसांची साधी गोष्ट आहे खरं तर. पण उगीचच वाढीव भावूकता, नाट्यमयता न आणता सुंदर मांडलीये.

बिफोर सनसेटमध्ये नऊ वर्षांनी तेच दोघं जण परत भेटतात. तोपर्यंत त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला लहान मुलगा असतो आणि ते दोघं भेटलेल्या संध्याकाळ-रात्रीवर आधारित एक पुस्तक लिहून तो लेखक झालेला असतो. या मधल्या वर्षांमध्ये त्यांचा एकमेकांशी कोणत्याच मार्गांनी काहीच संपर्क नसतो. इतक्या वर्षांनी भेटल्यावर मधल्या काळातल्या घडामोडी, अनेक नातेसंबंध, कुटुंब वगैरे ब-याच विषयांवर त्यांच्या गप्पा होतात. आधीच्या भेटी इतक्याच इंटेन्सिटीने ते एकमेकांशी बोलू शकतात.

या सिनेमाचे संवाद लिहिताना सिनेमातल्याच नट आणि नटीची मदत घेतलेली आहे, त्यामुळे खूपच नैसर्गिक, स्वाभाविक संवाद आहेत. रोमान्सची भडक कल्पनाच भारतीय सिनेमांमध्ये अनेकदा दिसते त्याच्या अगदी विरुद्ध असा खूप मस्त सिनेमा आहे हा.

आकर्षण, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, जवळीक, नातेसंबंध यांच्यावर वाचायला, लिहायला, पाहायला ज्यांना आवडतं त्यांनी हे दोन्ही सिनेमे जरूर पाहावेत असं वाटतं.

9 comments:

  1. हा चित्रपट खरंच एक उत्कृष्ट कलाकृती आहे... दुसरा भाग तर जास्तच अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  2. आत्ता तुमचा संपूर्ण ब्लॉग वाचून काढला.. लिखाणशैली आवडली. पुढच्या पोस्टची वाट पाहत आहे.

    ReplyDelete
  3. @ disamajikahitari
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
    पुढची पोस्ट लवकरच लिहिण्याचा प्रयत्न करते.
    तुमचा ब्लॉग आत्ताच पाहिला, पण अजून वाचायला वेळ झाला नाही. तोही लवकरच वाचेन.

    ReplyDelete
  4. tu ekdam chhan lihites..sarvach posts ekdam manatun aalyat n te janavt vachtana. Baryachvela antarmukh karnarya goshti lihilya aahes n barych goshti sahaj manat aalya mhanun, tashya aaplya pratyekachych manat khup vichar yet astat prattek mintaganik pan khup kamijan tya vicharavanvar vichar kartat...n u r one of them.
    Blog vachtana vegveglya bhavna anubhavlya..n ekhadi 'muktchchand' kavita vachtoi as kahis vatl.
    Pondichery n pravasavar lihi na tu vel kadhun..vachaila maja yeil.
    N picturevar turtas 'no comment'..pahun sangen kasa vatla..pan tuzya post varun tari picture bhari asel as vattai..

    ReplyDelete
  5. @Nilesh
    Thank you for all your comments.

    ReplyDelete
  6. Seema Tai you rock

    ReplyDelete
  7. सिनेमा छानच आहे. पण फक्त काही भावना व त्या बद्दल वाचायला, लिहायला, पाहायला आवडणे यापेक्षा खूप वेगळ्या कारणांसाठी तो सर्वांनी पाहावा असं वाटतं. त्यांत दाखवलेली सहज मैत्री, मोकळा संवाद या basic गोष्टी हि विचार करायला लावणाऱ्या आहेत

    ReplyDelete
  8. @Geeta
    arthatach. tu mhanateys tyach goshti mihi mhatalyat fakt shbd vegale kadachit. pratikriyebaddal aabhar.- Seema.

    ReplyDelete
  9. Thanks for the information regarding this two movies..

    ReplyDelete