Saturday, December 5, 2009

आनंद..

(खूप मित्र मैत्रिणी IT वगैरे क्षेत्रात काम करायला लागल्यापासून इतके बदलल्यासारखे वाटतायत की त्यांना बघून जे सुचलं ते लिहावसं वाटलं. यात नवीन काहीच नाही पण वाईट वाटलं ते शेअर करावंसं वाटलं इतकंच)

आजकाल एकूणच लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात कि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंदच वाटत नाही बहुदा. खूप काहीतरी प्रचंड वगैरे म्हणावा असा छान अनुभव आला तरच लोकं आनंदी होताना दिसतात. 'पैसे मिळवणं, साठवणं, अधिक पैसे मिळवणं, अधिकाधिक पैसे साठवणं या गोष्टीला इतका महत्त्वं देताना दिसतायत लोकं की कितीतरी साध्या गोष्टींमधला आनंद हरवत चाललाय.

जवळच्या माणसांना भेटून मिळणारा आनंद, सध्या गप्पांमधून मिळणारा आनंद, ट्रेकला जाताना- जाऊन आल्यावर त्या दमणुकीत येणारी मजा, सकाळी खिडकी उघडल्यावर उजेड आत आल्यावर- मोकळा रस्ता पाहिल्यावर येणारं छान फिलिंग, सुटीच्या दिवशी मोठ्ठा कप भरून सकाळी निवांत पेपर वाचत घेतलेला चहा, स्वीच ऑफ केल्यामुळे दिवसभरात एकदाही मोबाईल न वाजल्यामुळे वाटलेला निवांतपणा, कॉलेजमध्ये एका कठीण प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे सरांनी खिशातलं काढून दिलेलं पेन मिळाल्यामुळे मोठ्ठ बक्षीस मिळालं असं वाटणं या आणि अशा सगळ्या अनुभवांमध्ये कितीतरी मजा असते खरं तर ती कधी लक्षात घेणार आपण?

भारत आर्थिक महासत्ता वगैरे बनणार असं म्हणतात जाणकार मग त्याची किंमत म्हणून आत्ता जे कमी प्रमाणात जाणवतंय ते मोठ्या प्रमाणात जाणवायला लागणार की काय?
काय माहित काय होणार ते? मला मात्र हे लिहून शेअर केल्यामुळे आनंद झालाय हे नक्की.. :)

7 comments:

  1. hmm.pan khidaki ughadalyacha aanand,chhan gappa maralyacha aanand etc.he far personal aanand zale.asa aanand itaranni suddha ghyava he watan jari sahajik asal tari aapan tyat faras kahi karu shakat nahi.
    aani divasbharat ekahi phone n aalyacha aanand kharach khup bhari asato.

    ReplyDelete
  2. sarang-
    aanand hi arthatach vyaktisapeksh sankalpana aahe. konatya chhotya goshtinmadhun aanand ghyayacha he pratyekajan tharvel pan mulat asha goshtinmadhye aanand asato hech visarat chalalet lok asa vatat.. pratikriyebaddal aabhar..

    ReplyDelete
  3. Tu mhantiyes te khara aahe. Aaj kal Money=Happiness asa zalay. Ani apan paishya mage dhavtana sadhya simple happiness kay asto he wisrat challoy. The more disturbing thing is that everyone knows that but nobody is willing to change it. The main reason being in todays world u cant do anything if u dont earn good. Its like we are running in a race and the finish line does not exist.

    Its good that at least we try not to run behind money. Though having some dosent hurt. ;)

    ReplyDelete
  4. Ketan
    ....in todays world u cant do anything if u dont earn good..?????
    Do you really think so?
    Sorry but I dont really agree with it.

    ReplyDelete
  5. thts what i feel, need to earn good otherwise most things wont fall into place. May be our perspectives are different, our experiences are different.

    ReplyDelete
  6. विचार करायला वेळ न मिळणे हेही एक महत्वाचे कारण असावे... आयुष्याची गती ही जी एक गोष्ट असते ती फार विचित्र असते. सुरुवातीला पर्याय नसतो म्हणून; मग त्याला कर्मयोगाची जोड देऊन आणि त्याही नंतर सवय होते म्हणून; मग सगळ्यात शेवटी दुसरे काही करता येत नाही म्हणून.. पण माणूस जास्त इतर विचार न करता स्वतःला कामात जखडून घेतो खरा. बच्चन साहेबांची एक कविता आहे - जीवन की आपधापीमें कब वक्त मिला...जरूर वाचा ती.

    ReplyDelete
  7. @Nikhil Sheth
    तुम्ही लिहिलेल्याशी मी सहमत आहे. पण आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून काही गोष्टी मुद्दामहून करायला हव्यात असं निदान वाटायला तरी हवं ना? बरेच लोक हे विसरूनच जातात. मला याचं मनापासून वाईट वाटतं.
    हरीवंशराय बच्चन यांची ती कविता मी ऐकली आहे. त्या अल्बम मधल्या सगळ्याच कविता अप्रतिम आहेत.
    प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete